संजय दत्त फ्रँकीवाला ! संजूबाबाने सुरू केला फ्रँकीचा व्यवसाय, या ठिकाणी चाखायला मिळणार चव
मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त सध्या त्याच्या आगामी बागी 4 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, संजय दत्तशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याने स्वत:चे नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे. या आऊटलेटचे नाव ‘दत्त्स फ्रँकटी’ असे असून नुकतेच त्याचे उद्घाटन झाले. अभिनेत्याने त्याच्या नवीन व्यवसायाशी संबंधित सोशल मीडियावर काही पोस्ट देखील केल्या आहेत. त्यानंतर चाहत्यांकडून त्याचे अभिनंदन होत आहे. सलमान खाननेही त्याचे या नवीन व्यवसायासाठी कौतुक केले.
संजय दत्तचे हे नवीन रेस्टोरंट दुबईत आहे. याबाबत त्याने त्याच्या इंस्टाग्रामद्वारे ही माहिती लोकांमध्ये शेअर केली आहे. संजय दत्तने पत्नी मन्या दत्तसोबत हा व्यवसाय सुरू केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर व्यवसायाशी संबंधित काही व्हिडिओही शेअर केले आहेत. त्याने दुबई फूड डिलिव्हरी ॲपला देखील टॅग केले आहे. दुबईमध्ये राहणारे लोक या ॲपच्या मदतीने संजय दत्तच्या नवीन रेस्टॉरंटमधून तेथील पदार्थ ऑर्डर करू शकतात.